मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९४ड(घ) :
१.(डोक्यावर सुरक्षा साधन (हेल्मेट) न वापरल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, कलम १२९ च्या किंवा त्या अन्वये बनविलेल्या नियम व विनियमांचे उल्लंघन करुन मोटार सायकल चालविल किंवा इतर कोणा मार्फत चालविल किंवा चालविण्यास अनुमती देईल तो एक हजार रुपए इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि तीन महिने असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल आणि लायसन धारण करण्यास अपात्र होईल.)
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.