Mv act 1988 कलम १९२ : १.( नोंदणी न करता वाहन वापरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९२ :
१.( नोंदणी न करता वाहन वापरणे :
१) जो कोणी कलम ३९ च्या तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहन चालवील किंवा मोटार वाहन चालवायला लावील किंवा चालवू देईल त्याला पहिल्या अपराधाबद्दल कमीतकमी दोन हजार रूपये परंतु पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल आणि दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या तुरूंगवासाची किंवा कमीतकमी पाच हजार रूपये परंतु दहा हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
परंतु, न्यायालय कारणे लेखी नमूद करून ठेवून कमी शिक्षा देऊ शकेल.
२) निकडीच्या प्रसंगी आजारी पडलेल्या किंवा इजा झालेल्या व्यक्तींना नेण्यासाठी किंवा आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठक्ष दुरूस्तीची सामग्री वाहून नेण्यासाठी किंवा अन्न किंवा सामग्रह वाहन नेण्यासाठी किवा आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठी वैद्यकीय पुरवठ्याची सामग्री वाहून नेण्यासाठी मोटार वाहन वापरल्यास अशा वाहनाला या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.
३) पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या अपराधाबद्दल दोषी ठरवल्यास त्यावर ज्या न्यायालयाकडे अपील करता येते त्या न्यायालयाला खालच्या न्यायालयाने दिलेला कोणताही आदेश रद्द करता येईल किंवा त्यात फेरबदल करता येईल, मग ज्या दोषसिद्धीच्या संबंधात असा आदेश देण्यात आला होता तिच्याविरूद्ध अपील होऊ शकत नसले तरी हरकत नाही.
२.(स्पष्टीकरण :
कलम ५६ च्या तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहनाचा वापर केल्यास कलम ३९ च्या तरतुदींचे उल्लंघन मानले जाईल आणि उप-कलम (१) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणेच दंडनीय असेल.)
————
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ कलम ५६ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ७४ द्वारा स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply