मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९० :
असुरक्षित स्थितीत असलेले वाहन वापरणे :
१) एखाद्या मोटार वाहनामध्ये किंवा ट्रेलरमध्ये कोणताही दोष असेल आणि एखाद्या व्यक्तीला तो दोष माहीत असेल किंवा नेहमीचीच काळजी घेऊन तिला तो शोधून काढता येण्याजोगा असेल आणि त्या दोषामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असे वाहन चालवणे अशा ठिकाणाचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या किंवा वाहनांच्या दृष्टीने धोकादायक ठरत असेल तेव्हा अशा व्यक्तीने अशा सार्वजनिक ठिकाणी ते वाहन किंवा ट्रेलर चालवले किंवा चालवायला लावले किंवा चालवण्याची मुभा दिल्यास त्या व्यक्तीला १.(पंधराशे रुपये) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल, किंवा अशा दोषामुळे अपघात घडून आल असेल व त्यामुळे शारीरिक दुखापत किंवा मालमत्तेची हानी झाली असल्यास त्या व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा २(पाच हजार रुपये पर्यंत) इतक्या दंडाची किंवा या दोन्ही ३.(आणि नंतरच्या अपराधाबद्दल सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरंगवासाची किंवा त्यामुळे शारीरिक दुखापत किंवा मालमत्तेची हानी झाल्यास दहा हजार रुपयांपर्यंत) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकतील.
२) जर एखाद्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा, ध्वनी व हवा प्रदुषणाचे नियंत्रण या संबंधात ठरवून दिलेल्या मानकांचा ज्याच्यामुळे भंग होत असेल असे मोटार वाहन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चालवणाऱ्या किंवा चालवायला लावणाऱ्या किंवा चालवण्याची मुभा देणाऱ्या व्यक्तीला पहिल्या अपराधाबद्दल ४.(तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दह हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकेल आणि तीन महिन्याच्या कालावधीसाठी परवाना (लायसन) धारण करण्यासाठी अपात्र ठरेल) आणि कोणत्याही दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल ५.(सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही) शिक्षा होऊ शकेल.
३) मानवी जीविताच्या दृष्टीने धोकादायक किंवा जोखमीचा असलेल्या मालाची ने-आण करण्याशी संबंधित असलेल्या अशा या अधिनियमाच्या तरतुदींचा किंवा अधिनियमाखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचा भंग करणारे असे मोटार वाहन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चालवणाऱ्या किंवा चालवायला लावणाऱ्या किंवा चालवण्याची मुभा देणाऱ्या व्यक्तीला पहिल्या अपराधाबद्दल ६.(दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची आणि तीन महिन्याच्या कालावधीसाठी परवाना (लायसन) धारण करण्यासाठी अपात्र ठरेल) किंवा एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकेल आणि कोणत्याही दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल ७.(वीस हजार रुपयांपर्यंत) असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये दोनशे पन्नास रुपये याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये एक हजार रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये एक हजार रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये दोन हजार रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये तीन हजार रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७२ अन्वये पाच हजार रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.