Mv act 1988 कलम १८ : केंद्र शासनाच्या मालकीची वाहने चालविण्यासाठी चालकाचे लायसन :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८ :
केंद्र शासनाच्या मालकीची वाहने चालविण्यासाठी चालकाचे लायसन :
१) केंद्र शासनाकहून विहित करण्यात येईल असे प्राधिकरण, ज्यांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केली आहेत अशा व्यक्तींना, केंद्र शासनाची मालमत्ता असलेली किंवा त्या-वेळी केंद्र शासनाच्याच फक्त नियंत्रणाखाली वापरण्यात येत असलेली आणि देशाच्या संरक्षाणाची संबंधित शासकीय प्रयोजनासाठी वापरण्यात येत असलेली आणि कोणत्याही वाणिज्यिक उपक्रमाशी संबंधित नसलेली मोटार वाहने चालविण्यासाठी संपूर्ण देशात कायदेशरी असतील अशी चालकाची लायसने देऊ शकेल.
२) या कलमान्वये देण्यात आलेल्या चालकाच्या लायसनामध्ये लायसन धारक कोणत्या वर्गाचे किंवा वर्णनाचे वाहन चालविण्यास पात्र आहे आणि तो किती कालावधीसाठी पात्र आहे ते विनिर्दिष्ट करण्यात आलेले असेल.
३) या कलमान्वये चालकाचे लायसन देण्यात आलेल्या व्यक्तीला पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या मोटार वाहनाखेरीज अन्य कोणतेही मोटार वाहन चालविण्याचा हक्क असणार नाही.
४) या कलमाखाली कोणतेही चालकाचे लायसन देणाऱ्या प्राधिकरणाने, कोणत्याही राज्य शासनो विनंती केली असता, जिला चालकाचे लायसन देण्यात आलेले आहे अशा कोणत्याही व्यक्तीसंबंधीची त्या शासनाला त्या वेळी आवश्यक असेल ती माहिती पुरविली पाहिजे.

Leave a Reply