Mv act 1988 कलम १८६ : वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८६ :
वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे :
आपण वाहन चालवल्यामुळे लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहो अशा कोणत्याही रोगाने किंवा व्याधीने आपण ग्रस्त असल्याचे माहीत असताना जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवील त्याला पहिल्या अपराधाबद्दल १.(एक हजार रुपए) पर्यंत असू शकेल इतक्या दंडाची आणि दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल १.(दोन हजार रुपए) पर्यंत अशू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६९ द्वारा दोनशे रुपय वे पाचशे रुपये या शब्दांऐवजी क्रमश: समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply