मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८५ :
दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्यांचा अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालविणे :
जो कोणी मोटार वाहन चालवीत असताना किंवा चालवण्याच्या प्रयत्नात असताना,
(a)क) १.(अ) श्वासाची तपासणी करणाऱ्याने २.(किंवा कोणत्याही अन्य चाचणी द्वारे ज्याच्या अतंर्गत प्रयोगशाला चाचणी देखील येते, यात) केलेल्या चाचणीत त्याच्या रक्कात, प्रत्येक १०० मि.लि. रक्तात ३० मि.ग्रॅ. पेक्षा अधिक अल्कोहोल आढळुन आले असेल, किंवा)
(b)ख) ब) तो औषधिद्रव्याच्या इतक्या अंमलाखाली असेल की, वाहनावर आपला योग्य तो ताबा ठेवणे त्याला शक्य होणार नाही;
तर त्याला पहिल्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपर्यंत असू शकेल, इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा ३.(दहा हजार रुपये) असू शकेल, इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील, आणि ४.(***) दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा ५.(पंधरा हजार रुपये) असू शकेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
६.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, औषधी द्रव्य याचा अर्थ म्हणजे अल्कोहल व्यतिरिक्त कोणतेही मादक पदार्थ, नैसर्गिक किंवा कृत्रिम, किंवा कोणतीही नैसर्गिक सामग्री, किंवा कोणतेही मीठ, किंवा या अधिनियमान्वये केन्द्र सरकार अधिसूचित करील अशा पदार्थांची किंवा सामग्रीची निर्मिती अभिप्रेत आहे याशिवाय याच्या अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ याच्या कलम २ च्या खंड (१४) आणि (२३) मध्ये परीभाषित (व्याख्या) केल्यानुसार अंमली पदार्थ किंवा अंमली औषधिद्रव्ये यांचा समावेश होतो.)
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ५५ द्वारे मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६८ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६८ द्वारा दोन हजार रुपयांपर्यंत या ऐवजी समाविष्ट केले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६८ द्वारा पूर्वीचा असाच अपराध घडल्यापासून तीन वर्षाच्या आत घडला असल्यास हा मजकुर गाळण्यात आला.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६८ द्वारा तीन हजार रुपयांपर्यंत या ऐवजी समाविष्ट केले.
६. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६८ द्वारा मुळ स्पष्टीकरणाऐवजी समाविष्ट करण्यात आले.