मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८४ :
धोकादायक रीतीने वाहन चालविणे :
जो कोणी, जेथे वाहन चालविण्यात आले त्या जागेचे स्वरुप, स्थिती व उपयोग आणि त्यावेळी जितकी वाहतूक तेथे प्रत्यक्षपणे असेल किंवा असण्याची वाजवी शक्यता असेल त्या वाहतुकीचे प्रमाण यांसह प्रकरणाची सर्व परिस्थिती लक्षात घेऊन, जनतेस धोकादायक ठरेल १.(किंवा ज्यामुळे वाहनातील प्रवासी, इतर रस्ता वापरकरणाऱ्यांचे आणि रस्त्यांजवळील व्यक्तींना भय किंवा त्रासाची भावना निर्माण होईल) अशा रीतीने वाहन चालवील ती व्यक्ती, पहिल्या अपराधाबद्दल २.(एक वर्षापर्यंत असू शकेल परंतु सहा महिन्यापेक्षा कमी नसेल इतक्या कारावासास किंवा एक हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस) पात्र होईल, आणि पुर्वीचा अपराध केल्यापासून तीन वर्षाच्या आत नंतर पुन्हा तसाच अपराध करण्यात आला तर, कोणत्याही दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल, दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा ३.(दहा हजार रुपए) इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
४.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयाजेनार्थ, –
(a)क)अ) लाल दिवा ओलांडने (टाळून जाणे) ;
(b)ख)ब) स्टॉप (थांबा) साइनचे (चिन्ह) उल्लंघन करणे;
(c)ग) क) वाहन चालवताना हातातील संप्रेषण (संदेशाचे) साधनांचा वापर; (यासाठी केन्द्रीय मोटार वाहन नियम पहा).
(d)घ) ड) विधि (कायद्याच्या) विरुद्ध अन्य पद्धतीने इतर वाहनां जवळून जाने किंवा त्यांच्या पुढे जाने (ओव्हरटेक);
(e)ड) ई) वाहतुकीचच्या अधिकृत प्रवाहविरुद्ध वाहन चालविणे;
(f)च) फ) सक्षम आणि सावधान चालकाच्या अपेक्षापेक्षा कमी असलेल्या कोणत्याही पद्धतीने वाहन चालविणे आणि जेथे सक्षम आणि सावधान चालकाला हे स्पष्ट होईल की अशा पद्धतीने वाहन चालविणे धोकादायक असेल,
अशा पद्धतीने वाहन चालविणे जे लोकांसाठी धोकादायक आहे, असे अभिप्रेत असेल.)
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६७ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६७ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६७ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६७ द्वारा समाविष्ट करण्यात आले.