मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८१ :
कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून वाहन चालविणे :
जो कोणी कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून मोटार वाहन चालवीत त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा १.(पाच हजार रुपऐ) दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६३ द्वारा (पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.