Mv act 1988 कलम १७९ : आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७९ :
आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे :
१) या अधिनियमाखाली कायदेशीरपणे निदेश देण्याचा अधिकार मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने दिलेल्या अशा निदेशाची जो कोणी जाणूनबुजून अवज्ञा करील, किंवा कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने या अधिनियमाखाली पार पाडणे आवश्यक असलेली किंवा पार पाडण्याचा अधिकार मिळालेली कोणतीही कामे पार पाडण्यात अशा व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला जो कोणी जाणूनबुजून अडथळा करील, त्याला त्या अपराधाबद्दल दुसऱ्या कोणत्याही शिक्षेची तरतूद केलेली नसल्यास १.(दोन हजार रुपये)पर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
२) या अधिनियमाद्वारे किंवा त्या खाली कोणतीही माहिती पुरविण्यास फर्माविण्यात आले असता जो कोणी अशी माहिती हेतुपुरस्पर अडवून ठेवील किंवा जी माहिती खोटी असल्याचे त्याला माहीत असेल किंवा जी खरी आहे असे त्याला वाटत नेसल, अशी माहिती देईल त्याला त्या अपराधासाठी दुसऱ्या कोणत्याही शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नसल्यास एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा १.(दोन हजार रुपये) पर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६१ द्वारा (पाचशे रूपयांपर्यंत) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply