मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण १३ :
अपराध, दंड आणि कार्यपद्धती :
कलम १७७ :
अपराध्यांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी :
जो कोणी या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाच्या, विनियमाच्या किंवा अधिसूचनेच्या कोणत्याही तरतुदीचा भंग करील त्याला, त्या अपराधासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद केलेली नसल्यास पहिल्या अपराधासाठी १.(पाचशे रुपये) पर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याही अपराधासाठी १.(एक हजार पाचशे रुपये) पर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ५८ द्वारा (शंभर रुपये व तिनशे रुपये) शब्दांऐवजी क्रमश: समाविष्ट करण्यात आले.