मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७६ :
राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
कलम १६५ ते १७४ च्या तरतूदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील आणि अशा नियमांमध्ये विशेषत: पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करता येतील –
(a)क)अ) भरपाईच्या मागणीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना आणि त्यामध्ये देता येईल तो तपशील आणि अर्जांच्या संबंधात कोणतीही फी भरावयाची असल्यास ती फी;
(b)ख)ब) या प्रकरणाखालील चौकशीचे कामकाज चालविताना दावा न्यायाधिकरणाने वापरण्याची कार्यपद्धती;
(c)ग) क) दिवाणी न्यायालयाकडे निहित असलेले जे अधिकार दावे न्यायाधिकरणाला वापरता येतील ते अधिकार;
(d)घ)ड) दावा न्यायाधिकरणाच्या निवाड्याविरूद्ध ज्या नमुन्यात आणि ज्या रीतीने आणि जी फी (कोणतीही असल्यास) भरल्यानंतर अपील दाखल करता येईल, तो नमुना ती रीत आणि ती फी; आणि
(e)ड)ई) ठरवून घ्यावयाची आणि ठरवून देता येईल अशी इतर कोणतीही बाब.