मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७५ :
दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी :
कोणत्याही क्षेत्रासाठी कोणत्याही दावे न्यायधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असेल, तेव्हा त्या क्षेत्राच्या दावा न्यायाधिकरणाला जिचा निर्णय देता येईल, अशा भरपाईसाठीच्या कोणत्याही मागणीशी संबंधित असलेला कोणताही प्रश्न विचारार्थ दाखल करून घेण्यास कोणत्याही दिवाणी न्यायालयाला अधिकारिता असणार नाही आणि ते दिवाणी न्यायालय भरपाईसाठीच्या कोणत्याही मागणीच्या संबंधात दावे न्यायाधिकरणाने किंवा त्याच्यासमोर घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या कोणत्याही कारवाईसंबंधात कोणताही मनाई आदेश देणार नाही.