मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७४ :
विमा उतरवणाऱ्याकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे पैशीची वसुली करणे :
निवाड्यानुसार कोणतीही व्यक्ती कोणतीही रक्कम देणे लागत असेल, त्या बाबतीत त्या रकमेस हक्कदार असणाऱ्या व्यक्तीने दावा न्यायाधिकरणाकडे केलेल्या अर्जावरून ते न्यायाधिकरण त्या रकमेसाठी एक दाखला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवील आणि जिल्हाधिकारी जमीन महसुलाची थकबाकी ज्या रीतीने वसूल करण्यात येते त्याच रीतीने ती रक्कम वसूल करील.