Mv act 1988 कलम १७३ : अपिले :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७३ :
अपिले :
१) दावा न्यायाधिकरणाच्या निवाड्यामुळे स्वत:वर अन्याय झाला आहे असे वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, पोट-कलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून, निवाड्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत उच्छ न्यायालयाकडे अपील करता येईल :
परंतु, अशा निवाड्यानुसार जिने कोणतीही रक्कम भरणे आवश्यक असेल, त्या व्यक्तीने पंचवीस हजार रूपये किंवा अशा निवाड्यातील रकमेच्या पन्नास टक्के रक्कम यापैकी जी कमी असेल, ती रक्कम उच्च न्यायालय सूचना देईल त्या रीतीने उच्च न्यायालयाकडे जमा केल्याकेरीज त्या व्यक्तीने केलेले अपील उच्च न्यायालयाकडे जमा केल्याखेरीज त्या व्यक्तीने केलेले अपील उच्च न्यायालयाकडे जमा केल्याखेरीज त्या व्यक्तीने केलेले अपील उच्च न्यायालय विचारार्थ स्वीकारणार नाही.
परंतु आणखी असे की, अपीलकाराला वेळेवर अपील दाखल करण्यात पुरेशा कारणामुळे अडथळा आला होता याबद्दल उच्च न्यायालयाची खात्री पटल्यास त्याला नव्वद दिवसांची सदर मुदत समाप्त झाल्यानंतरदेखील ते अपील विचारार्थ स्वीकारता येईल.
२) अपिलातील वाद्रगस्त रक्कम १.(एक लाख) रूपयांपेक्षा कमी असल्यास दावे न्यायाधिकरणाच्या कोणत्याही निवाड्याविरूद्ध अपील करता येणार नाही.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ५६ द्वारा (दहा हजार) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply