मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७२ :
ठराविक प्रकरणामध्ये खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय देणे :
१) या अधिनियमाखाली भरपाईसाठी करण्यात आलेल्या मागणीचा निर्णय करणाऱ्या कोणत्याही दावे न्यायाधिकरणाची कोणत्याही प्रकरणामध्ये लेखी नमूद करून ठेवायच्या कारणांवरून अशी खात्री पटली की-
(a)क) अ) महत्वाचा तपशील खोटा असलेली अशी वस्तुस्थिती नमूद करून विम्याची पॉलिसी मिळविण्यात आलेली असल्यामुळे ती पॉलिसी रद्दबातल ठरलेली आहे; किंवा
(b)ख) ब) कोणत्याही पक्षकाराने किंवा विमा उतरवणाऱ्याने खोटी किंवा केवळ त्रास देण्याच्या हेतूने मागणी केलेली आहे अथवा खोटा किंवा त्रास देण्याच्या हेतूने बचाव केलेला आहे, तर असे न्यायाधिकरण खोटी वस्तुस्थिती नमूद केल्याबद्दल दोषी असलेल्या पक्षकाराने किंवा ज्याने अशी मागणी केलेली असेल अथवा बचाव दिलेला असेल त्या पक्षकाराने विमा उतरविणाऱ्याला किंवा प्रकरणपरत्वे ज्या पक्षकाराविरूद्ध अशी मागणी करण्यात आलेली असेल किंवा बचाव देण्यात आला असेल, त्या पक्षकाराला भरपाई म्हणून विशेष खर्च द्यावा असा आदेश देऊ शकेल.
२) कोणतेही दावा न्यायाधिकरण, विशेष खर्चासाठी एक हजार रूपयांपेक्षा अधिक रकमेचा आदेश देणार नाही.
३) या कलमाखाली जिच्याविरूद्ध आदेश देण्यात आला असेल, त्या कोणत्याही व्यक्तीची किंवा विमा उतरविणाऱ्याची, असा आदेश देण्यात आला आहे म्हणून किंवा अशी रक्कम भरली म्हणून पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या खोट्या वस्तुस्थितीबद्दलच्या मागणीबद्दलच्या फौजदारी जबाबदारीतून सुटका होणार नाही.
४) कोणत्याही खोट्या माहितीच्या, मागणीच्या किंवा बचावाच्या संबंधात या कलमाखालीभरपाई म्हणून देवविली कोणतीही रक्कम अशा खोट्या माहितीच्या मागणीच्या किंवा दाव्याच्या संबंधात भरपाई मिळण्याकरिता नंतर लावलेल्या कोणत्याही नुकसानीच्या दाव्यात विचारात घेण्यात येईल.