Mv act 1988 कलम १६८ : दावा न्यायाधिकरणाचा निवाडा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६८ :
दावा न्यायाधिकरणाचा निवाडा :
१) कलम १६६ खाली भरपाईसाठी करण्यात आलेला अर्ज मिळाल्यावर दावा न्यायाधिकरण अर्जाबद्दल नोटीस विमा काढणाऱ्याला दिल्यांनतर आणि पक्षकारांना (विमा काढणारा धरूपन) त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर मागणीची किंवा प्रकरणपरत्वे प्रत्येक मागणीची चौकशी करील आणि १.(कलम १६३) च्या तरतुदींच्या अधीन राहून त्याला न्याय्य वाटेल इतकी भरपाईची रक्कम ठरवून देणारा आणि कोणत्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना भरपाई देण्यात येईल ते नमूद करणारा निवाडा देता येईल आणि असा निवडा देताना दावा न्यायाधिकरण अपघात झालेल्या वाहनाचा विमा उतरविणाऱ्याने किंवा मालकाने किंवा चालकाने किंवा त्यांच्यापैकी सर्वांनी किंवा प्रकरणपरत्वे कोणीही किती रक्कम द्यावी ते नमूद करील.
२.(***)
२) दावे न्यायाधिकरण निवाड्याच्या प्रती संबंधित पक्षकारांना शीघ्रतेने आणि काही असले तरी निवाडा दिल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत देण्याची व्यवस्था करील.
३) या कलमाखाली निवडा देण्यात येईल त्या वेळी अशा निवाड्यातील शर्तीनुसार ज्या व्यक्तीने कोणतीही रक्कम देणे आवश्यक असेल, ती व्यक्ती दावे न्यायाधिकरणाने निवाडा जाहीर केल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत ती संपूर्ण रक्कम दावे न्यायाधिकरण सूचना देईल त्या रीतीने जमा करील.
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ५४ द्वारा (कलम १६३) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आला.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ५४ द्वारा परंतुक (परंतु, अशा अर्जामध्ये, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूच्या किंवा कायमच्या अपंगत्वाच्या संबंधात कलम १४० खाली भरपाईची मागणी केलेली असेल, त्या बाबतीत अशा मृत्यूच्या किंवा कायमच्या अपंगत्वाच्या संबंधातील भरपाईची अशी मागणी किंवा इतर कोणतीही मागणी (मग ती अशा अर्जात केलेली असो किंवा इतर प्रकारे केलेली असो ) प्रकरण दहाच्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल.) वगळण्यात आले.

Leave a Reply