मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६७ :
विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार :
कामगारभरपाई अधिनियमाम्ये (१९२३ चा ८) काहीही अंतर्भूत केलेले असेल तरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे किंवा तिला झालेल्या शारीरिक इजेमुळे या अधिनियमाखाली तसेच कामगारभरपाई अधिनियम, १९२३ खाली भरपाईची मागणी करता येत असेल, तेव्हा भरपाई मिळण्यास हक्कदार असलेल्या व्यक्तीला, प्रकरण दहाच्या तरतुदींना बाधा न येता त्या अधिनियमांपैकी कोणत्याही एका अधिनियमाखाली, मात्र दोन्ही अधिनियमांखाली नव्हे, भरपाईची मागणी करता येईल.