मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६६ :
भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज :
१) कलम १६५, पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या अपघाताच्या बाबतीतील भरपाईसाठी पुढील व्यक्तींना अर्ज करता येईल-
(a)क)अ) जिला इजा झाली ती व्यक्ती; किंर्वा
(b)ख)ब) मालमत्तेचा मालक; किंवा
(c)ग) क) अपघातामुळे मृत्यू घडून आला असेल, त्या बाबतीत मयत व्यक्तीचे सर्व किंवा कोणतेही कायदेशीर प्रतिनिधी; किंवा
(d)घ) ड) इजा झालेल्या व्यक्तीने किंवा प्रकरणपरत्वे मयत व्यक्तीचे सर्व किंवा कोणतेही कायदेशीर प्रतिनिधींनी रीतसर अधिकार दिलेला कोणताही एजंट:
परंतु, मयत व्यक्तीचे सर्व कायदेशीर प्रतिनिधी अशा भरपाईच्या अजामध्ये सामील झालेले नसतील, तर मयत व्यक्तीच्या सर्व कायदेशीर प्रतिनिधींच्या वतीने किंवा त्यांच्या फायद्यासाठी अर्ज करण्यात येईल आणि जे कायदेशीर प्रतिनिधी त्यात सामील झालेले नसतील त्यांचा समावेश अर्जाचा प्रतिवादी म्हणून करण्यात येईल :
१.( परंतु आणखी असे की, कलम १४९ अन्वये उपबंधित प्रक्रिये नुसार कलम १६४ अन्वये भरपाईचा स्विकार केला असेल तर त्याने दावा न्यायाधिकरणापुढे केलेला दावा रद्द होईल.)
२.(२) पोट-कलम (१) खालील प्रत्येक अर्ज (भरपाई मिळण्याचा) दावा करणाऱ्याच्या इच्छेनुसार, जेथे अपघात घडला त्या क्षेत्रावर अधिकार असलेल्या दावा न्यायाधिकरणाकडे किंवा दावा सांगणारा ज्याच्या अधिकारक्षेत्राच्या स्थानिक सीमांमध्ये राहत असेल किंवा कामधंदा करत असेल, त्या दावा न्यायाधिकरणाकडे किंवा प्रतिवादी ज्याच्या अधिकारक्षेत्राच्या स्थानिक सीमांमध्ये राहत असेल, त्या दावे न्यायाधिकरणाकडे करण्यात येईल आणि तो अर्ज ठरवून देण्यात येईल, अशा नुमन्यात असेल आणि ठरवून देण्यात येईल असा तपशील त्यात असेल;
३.(***))
४.(३) अपघात घडल्यापासून सहा महिन्यांच्या आत भरपाईचा अर्ज केला नसल्यास, अर्जाचा विचार केला जाणार नाही.)
५.(४) ६.(कलम १५९) नुसार दावे न्यायाधिकरणाकडे पाठविण्यात आलेला अपघातांचा कोणताही अहवाला म्हणजे या कलमाखालील भरपाईसाठी करण्यात आलेला अर्ज आहे असे ते न्यायाधिकरण मानील.)
७.(५) या अधिनियमात किंवा अंमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अपघातामध्ये क्षतीसाठीचा दावा मागण्याचा हक्क, जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या क्षतीमुळे झाला असेल अगर नसेल त्याचा संबंध न येता भरपाई मागण्याचा हक्क असेल.)
——-
१. २०१९ चा अधिनियमा क्रमांक ३२ याच्या कलम ५३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ५३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियमा क्रमांक ३२ याच्या कलम ५३ अन्वये परंतुक वगळण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियमा क्रमांक ३२ याच्या कलम ५३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
५. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ५३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियमा क्रमांक ३२ याच्या कलम ५३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा अधिनियमा क्रमांक ३२ याच्या कलम ५३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.