Mv act 1988 कलम १६५ : दावा न्यायधिकरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण १२ :
दावा न्यायाधिकरणे :
कलम १६५ :
दावा न्यायधिकरणे :
१) राज्य शासन शासकीय राजपत्रात एक अधिसूचना प्रसिद्ध करून तिच्यात नमूद करण्यात येईल, अशा क्षेत्रासाठी त्या अधिसूचनेद्वारे एका किंवा अधिक मोटार अपघात दावा न्यायाधिकरणांची (या प्रकरणात यापुढे त्यांच्या उल्लेख दावा न्यायाधिकरण असा केलेला आहे) स्थापना करू शकेल. ज्या अपघातांमध्ये मोटार वाहनांच्या उपयोगातून व्यक्तींचा मृत्यू घडून येतो किंवा त्यांना शारीरिक इजा होते किंवा त्रयस्थ पक्षाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होते किंवा या दोन्ही गोष्टी घडतात. त्या अपघातासंबंधात भरपाई मिळण्यासाठी करण्यात आलेल्या मागण्यांचा निर्णय हे न्यायाधिकरण करील.
स्पष्टीकरण :
शंकानिरसनासाठी याद्वारे असे जाहीर करण्यात येते की, ज्या अपघांतामध्ये मोटार वाहनांच्या उपयोगातून व्यक्तींचा मृत्यू घडून येतो किंवा त्यांना शारीरिक इजा होते त्या अपघातासंबंधात भरपाई मिळण्यासाठी करण्यात आलेल्या मागण्यात या शब्दप्रयोगामध्ये १.(कलम १६४) खाली भरपाईसाठी केलेल्या मागण्यांचा समावेश आहे.
२) दावा न्यायाधिकरणामध्ये, राज्य शासनाला नेमणूक करणे योग्य वाटेल इतक्या सभासदांचा समावेश असेल आणि दोन किंवा अधिक सभासद असतील तेव्हा त्यांच्यापैकी एकाची न्यायाधिकरणाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येईल.
३) एखादी व्यक्ती-
(a)क)अ) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे किंवा होती, अथवा
(b)ख)ब) जिल्हा न्यायाधीश आहे किंवा होत; अथवा
(c)ग) क) उच्च न्यायालयाचचा न्यायाधीश २.(किंवा जिल्हा न्यायाधीश) म्हणून नेमली जाण्यासाठी तिच्याकडे पात्रता आहे, असे असल्याखेरीज, दावा न्यायालयाचा सभासद म्हणून नेमणूक होण्यासाठी लागणारी पात्रता तिच्याकडे आहे असे ठरणार नाही.
४) कोणत्याही क्षेत्रासाठी दोन किंवा अधिक दावे न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात येईल तेव्हा राज्य शासनाला, त्या न्यायाधिकरणांमध्ये कामाची वाटणी अशी करावयाची ते सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून त्याद्वारे ठरवून देता येईल.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ५२ द्वारा (कलम १४० आणि कलम १६३ अ) शब्दां ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ कलम ५२ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply