मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६४ब (ख) :
१.(मोटारवाहन अपघात निधी :
१) केन्द्र शासन द्वारा मोटारवाहन अपघात नावाचा निधी स्थापन केला जाईल, यामध्ये निम्नलिखित बाबी जमा केल्या जातील –
(a)क)अ) रक्कम देण्याची पद्धत केन्द्र शासनाद्वारे अधिसूचित करणे आणि मान्य करणे;
(b)ख)ब) केन्द्र शासनाद्वारा दिलेले निधीमध्ये कोणतेही अनुदान किवा कर्ज ;
(c)ग) क) कलम १६३ अंतर्गत तयार केलेल्या योजनेंतर्गत तयार केलेल्या निधीची शिल्लक, जसे मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ च्या प्रारंभापूर्वी स्थापित होता; आणि
(d)घ) ड) उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन, जे केन्द्र शासन द्वारा विहित केले जाईल.
२) भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व रस्ता वापरकत्र्यांना सक्तीच्या विम्याच्या तरतुदीसाठी निधी स्थापन केला जाईल.
३) निधीचा वापर निम्नलिखित गोष्टींसाठी केला जाईल –
(a)क)अ) केन्द्र शासन द्वारा कलम १६२ च्या अन्वये बनविलेल्या योजनेअंतर्गत रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचार देणे;
(b)ख)ब) कलम १६१ अन्वये बनविलेल्या योजेननुसार अशा अपघातात धकड मारुन पळून गेलेल्या वाहनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या प्रतिनिधींना भरपाई देणे;
(c)ग) क) कलम १६१ अन्वये बनविलेल्या योजेननुसार अशा अपघातात धकड मारुन पळून गेलेल्या वाहनामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना भरपाई देणे;
(d)घ) ड) अशा व्यक्तींना भरपाई देणे, जे केन्द्र शासन द्वारा विहित केले जाईल.
४) केन्द्र शासन विहित करेल एवढी जास्तीत जास्त दायित्वाची रक्कम प्रत्येक दाव्यात दिली जाईल.
५) पोटकलम (३) च्या खंड (अ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे सर्व दाव्यांमध्ये ज्यावेळेस कोणत्याही व्यक्तीला दाव्याची रक्कम द्यावयाची असेल तर अशा व्यक्तीला विमा कंपनीकडून मिळालेल्या रकमेमधून अशी रक्कम कमी केली जाईल.
६) निधीचे व्यवस्थापन अशा प्राधिकारी किंवा अभिकरण (एजन्सी) द्वारा केले जाईल जे केन्द्र शासन निम्नलिखित बाबींना विचारात घेऊन विनिर्दिष्ट करेल –
(a)क)अ) एजन्सीच्या विमा व्यवसायाचे ज्ञान;
(b)ख)ब) निधींचे व्यवस्थापन करण्याची एजन्सीची क्षमता;
(c)ग) क) इतर अन्य मापदंड जे केन्द्र शासन द्वारा विहित केले जाईल.
७) केन्द्र शासन, योग्य ते हिशोब ठेवेल आणि त्याशी सुसंगत दस्तावेज ठेवल आणि भारताचे नियंत्रक महालेखापरिक्षक यांच्याशी विचार विनिमय करुन विहित केले जाणाऱ्या पद्धतीत निधीचे एक वार्षिक विवरणपत्र तयार करेल.
८) निधीच्या हिशेबाची तपासणी, भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक द्वारा त्यांच्या द्वारा विनिर्दिष्ट केले जाईल अशा अंतराने केली जाईल.
९) भारताचा नियंत्रक महालेखापरिक्षक किंवा त्याच्या द्वारा या अधिनियमान्वये निधी च्या हिशेबाची तपासणी संबंधात नियुक्त इतर अन्य व्यक्तीजवळ सरकारी हिशेबांची अशी तपासणीच्या संबंधात तेच अधिकार, विशेषाधिकार आणि प्राधिकार असतील आणि विशिष्ट स्वरुपात त्यांच्या जवळ हिशेबांची वही, हिशेब, संबंधीत व्हावचर, अन्य दस्तावेज तसेच कागदपत्र सादर करण्याची मागणी करणे आणि प्राधिकरणाच्या कोणत्याही कार्यालायाचे निरीक्षण करण्याचे अधिकार असतील.
१०) भारताच नियंत्रक महालेखापरिक्षक किंवा त्याच्या द्वारे या अधिनियमान्वये या निमित्त नियुक्त केलेली व्यक्ती यांनी प्रमाणीत केलेल निधीचे हिशेब, तपासणी अहवाला सहित वार्षिक स्वरुपात केन्द्र शासनाला पाठविल आणि केन्द्र शासन संसदेच्या प्रत्येक मंडळापुढे तो सादर करील.
११) कलम १६१ च्या पोटकलम (३) अन्वये बनविलेली कोणतीही योजना, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ प्रारंभा पूर्वी बंद केल्या जातील आणि उक्त अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेपासून त्याच्या अधीन असलेले सर्व अधिकार आणि दायित्वांची पूर्ती निधी मधून केली जाईल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.