Mv act 1988 कलम १६२ : १.(सुवर्णकाळासाठी योजना :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६२ :
१.(सुवर्णकाळासाठी योजना :
१) सर्वसाधारण विमा कंपनी (राष्ट्रीयीकरण) अधिनियम १९७२ यामध्ये किंवा त्यात्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये किंवा कायद्याचा प्रभाव असणाऱ्या कोणत्याही विलेखात काहीही अंतर्भूत असले तरी भारतामध्ये त्या त्यावेळी विमा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यानी या अधिनियमाच्या उपबंधानुसार आणि या अधिनियमानुसार बनविलेल्या योजना अन्वये रस्त्यावरील अपघातग्रस्त व्यक्तींना सुवर्णकाळा दरम्यान उपचारा साठी सुविधा पुरविण्यासाठी उपबंध केले पाहिजे.
२) केन्द्र शासन, सुवर्णकाळामध्ये रस्त्यावरील अपघातातील पीडित व्यक्तींना रोख पैशाविना उपचारासाठी योजना बनवेल आणि अशा योजनेमध्ये अशा सुविधासाठी निधी निर्माण करण्याची तरतुद करेल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply