मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६० :
१.(अपघात झालेल्या वाहनाचा तपशील देण्याचे कर्तव्य :
जर मोटार वाहन उपयोगात आणण्यातून उद्भवलेल्या अपघाताबाबत भरपाई मागण्यास आपण हक्कदार आहोत असे अभिकथन करणाऱ्या व्यक्तीने मागणी केल्यास किंवा जर कोणत्याही मोटार वाहनाबाबत ज्याच्याविरुद्ध मागणी करण्यात आली आहे त्या विमाकाराने मागणी केल्यास, नोंदणी प्राधिकरण किंवा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी विहित फी भरण्यात आल्यावर त्या व्यक्तीला किंवा प्रकरणपरत्वे, त्या विमाकाराला, वाहनाची ओळख चिन्हे व इतर तपशील आणि अपघाताच्या वेळी, जी व्यक्ती वाहन उपयोगात आणीत होती किंवा जिला त्यामुळे इजा पोहोचली त्या व्यक्तीचे नाव व पत्ता आणि केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा स्वरुपात आणि अशा कालावधीत नुकसान झाले असेल अशी कोणतीही मालमत्ता असल्यास, ती मालमत्ता यासंबंधात उक्त प्राधिकरण किंवा उक्त पोलीस अधिकारी त्यांच्या हाती असेल अशी कोणतीही माहिती पुरवील.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.