मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५४ :
१.(कलमे १५१, १५२ व १५३ याबाबतीतील व्यावृत्ती :
१) कलम १५१, १५२ व १५३ च्या प्रयोजनाकरिता कोणत्याही विमापत्राखाली विमारक्षित असलेल्या व्यक्तींच्या संबंधात, त्रयस्थ पक्षाप्रत असलेले दायित्व असा जो उल्लेख येईल त्यामध्ये अन्य कोणत्याही विमापत्राखाली विमाकार या नात्याने त्या व्यक्तीवर येणाऱ्या कोणत्याही दायित्वाचा उल्लेख अंतर्भूत असणार नाही.
२) केवळ पुनर्रचना करणे किंवा दुसऱ्या कंपनीशी एकत्रीकरण करणे एवढ्याच प्रयोजनार्थ एखादी कंपनी समापित झाली असेल त्याबाबतीत, कलम १५१, १५२ व १५३ यांचे उपबंध लागू होणार नाहीत.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.