मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५३ :
१.(विमाकार व विमेदार यांच्यात तडजोड :
१) कलम १४७ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्वरुपाच्या कोणत्याही दायित्वाबाबत त्रयस्थ पक्षाला जी कोणतीही हक्कमागणी करता येईल त्याबाबत विमाकाराने केलेल्या कोणत्याही तडजोडीमध्ये असा त्रयस्थ पक्ष हा एक पक्ष असल्याशिवाय, ती तडजोड विधिग्राह्य असणार नाही.
२) दावा न्यायाधिकरणाची अशी खात्री झाली पाहिजे की तडजोड ही कोणत्याही दबावाखाली केलेली नाही खरीखुरी आहे आणि कलम १६४ च्या पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या रकमेच्या सूचीप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे.
३) या प्रकरणाच्या प्रयोजनांसाठी देण्यात आलेल्या विमापत्राखाली ज्या व्यक्तीला विमारक्षित केलेले आहे, अशी व्यक्ती दिवाळखोर झालेली असेल त्याबाबतीत, अथवा तशी विमारक्षित व्यक्ती ही कंपनी असेल तर, त्या कंपनीसंबंधी समापनाचा आदेश देण्यात आला असेल किंवा स्वेच्छापूर्वक समापन करण्याचा ठराव संमत करण्यात आला असेल त्याबाबतीत, त्रयस्थ पक्षासंबंधी दायित्व उद्भवल्यानंतर आणि दिवाळखोरीस किंवा, प्रकररपरत्वे, समापनास प्रारंभ झाल्यानंतर विमाकार व विमेदार व्यक्ती यांच्यामध्ये करण्यात आलेला कोणताही करार, तसेच पूर्वोक्त गोष्टींना प्रारंभ झाल्यानंतर विमाकार व विमेदार व्यक्ती यांच्यामध्ये करण्यात आलेला कोणताही करार, तसेच पूर्वोक्त गोष्टींना प्रारंभ झाल्यानंतर विमेदार व्यक्तीने केलेले कोणतेही हक्कवर्जन, अभिहस्तांकन किंवा अन्य विल्हेवाट अगर तिला करण्यात आलेले प्रदान हे, जेणेकरुन या प्रकरणाखाली त्रयस्थ पक्षाकडे हस्तांतरित झालेले अधिकार विफल होतील अशा प्रकारे परिणामक होणार नाही, तर जणू काही असा कोणताही करार, हक्कवर्जन, अभिहस्तांकन किंवा विल्हेवाट किंवा प्रदान हे करण्यात आलेले नसावे त्याप्रमाणे ते अधिकार तसेच राहतील.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.