मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १४९ :
१.(विमा कंपनी द्वारा तडजोड आणि त्याची पद्धत :
१) विमा कंपनी, दावेदाराकडून किंवा अपघाताची माहिती अहवालाच्या माध्यमातून किंवा इतर प्रकारे अपघाताची सूचना प्राप्त झाल्यानंतर अशा अपघाताच्या दाव्यांच्या तडजोडीसाठी एक अधिकारी नियुक्त करेल.
२) विमा कंपनीने नुकसान भरपाईच्या दाव्यामध्ये तडजोड करण्यासाठी नियुक्त केलेली अधिकारी दावा करणाऱ्याला दावा न्यायधिकरणाकडे जाण्यापूर्वी तीस दिवसांच्या आत केन्द्र शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीप्रमाणे तडजोडीची तयारी दर्शविल.
३) जर दावाकर्ताने पोटकलम (२) अन्वये प्रस्ताव केला असेल,-
(a)क) अ)असा प्रस्ताव स्विकारेल,तर
एक) दावा न्यायाधिकरण अशा तडजोडीची नोंद करेल आणि अशा दावामध्ये दोघांच्या संमतीने तडजोड झाली आहे असे समजले जाईल; आणि
दोन) तडजोडीची नोंद झाल्याच्या दिनांकापासून विमा कंपनी जास्तीत जास्त तीस दिवसाच्या आत रक्कम देईल.
(b)ख) ब) असा प्रस्ताव नामंजूर करेल,तर दावा न्यायालय त्यातील गुण अवगुणावर न्यायनिर्णय करण्यासाठी, दावा चालविण्याचा दिनांक निश्चित करेल.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.