Mv act 1988 कलम १४७ : १.(विमापत्राबाबतच्या आवश्यकता व दायित्वाच्या मर्यादा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १४७ :
१.(विमापत्राबाबतच्या आवश्यकता व दायित्वाच्या मर्यादा :
१) या प्रकरणाच्या आवश्यकता पूर्ण होण्यासाठी, विमा पॉलिसी किंवा विमापत्र हे –
(a)क) अ) प्राधिकृत विमाकार असलेल्या अशा व्यक्तीने दिलेले आहे असे; आणि
(b)ख) ब) विमापत्रात विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीवर्गाचा,-
एक) सार्वजनिक ठिकाणी वाहनाचा उपयोग करण्यामुळे मालाचा मालक किंवा वाहनामधून वाहून नेण्यात येत असेल असा त्याचा प्राधिकृत प्रतिनिधी यांसह कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु घडून येणे किंवा तिला शारीरिक इजा पोहोचणे अथवा त्रयस्थ पक्षाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होणे या संबंधात त्याच्यावर येईल अशा कोणत्याही दायित्वाबद्दल;
दोन) सार्वजनिक ठिकाणी वाहनाचा उपयोग करण्यामुळे उद्भवलेला अथवा त्या कारणामुळे सार्वजनिक सेवा वाहनातील कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू अथवा शारीरिक इजा या बद्दल;
पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यन्त, विमा उतरवणारे असे विमा पत्र असले पाहिजे
स्पष्टीकरण :
शंकानिरसनार्त याद्वारे असे घोषित करण्यात येत आहे की, ज्या कृतीमुळे अथवा अकृतीमुळे अपघात झाला ती सार्वजनिक ठिकाणी घडून आली असेल तर, त्यायोगे जिचा मृत्यू झाला अथवा जिला शारीरिक इजा झाली अशी कोणतीही व्यक्ती किंवा त्रयस्थ पक्षाच्या ज्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले ती मालमत्ता अपघाताच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी नव्हती असे असले तरीही, त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा तिला झालेली इजा अगर त्या मालमत्तेचे नुकसान सार्वजनिक ठिकाणी वाहनाचा उपयोग केल्याने घडले किंवा त्यातून ते उद्भवले असे मानले जाईल.
२) त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात काहीही असले तरीही, एखाद्या व्यक्तीचा मृत्यु किंवा गंभीर दुखापत च्या संबंधित त्रयस्थ पक्षकार च्या विमा प्रयोजनासाठी, केन्द्र शासन विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाबरोबर विचारविनिमय करुन पोटकलम (१) अन्वये विमा पॉलिसीसाठी एक पायाभूत हप्ता विहित करेल आणि बरोबरच अशा हप्ता संबंधात विमाकर्ताचे दायित्व ही विहित करेल.
३) ज्या व्यक्तीने विमापत्र काढले तिच्या नावे विमाकाराने विहित नमुन्यात आणि ज्यांच्या अधीनतेने विमापत्र द्यावयाचे अशा कोणत्याही शर्तीचा व अन्य कोणत्याही विहित बाबींचा विहित तपशील अंतर्भूत असलेले विमाप्रमाणपत्र दिल्याशिवाय व देईपर्यन्त या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ ते विमापत्र परिणामक होणार नाही, आणि वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळे नमुने, तपशील व बाबी विहित करता येतील.
४) या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ पूर्वी कोणतीही विमा पॉलिसी करारान्वये विद्यमान निबंधनानुसार चालू राहील आणि या अधिनियमाचे उपबंध अशा प्रकारे लागू होतील जसे या अधिनियमात उक्त अधिनियमानुसार सुधारणा केली नाही.
५) या प्रकरणाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या उपबंधाखालाी विमाकाराने दिलेल्या उपरिटिप्पणीच्या पाठोपाठ विहित मुदतीत विमापत्र दिले गेले नाही तर, विमाकार उपरिटिप्पणि विधिग्राह्यतेचा कालावधी समाप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत ते तथ्य, उपरिटिप्पणी ज्याच्याशी संबंधित आहे अशा वाहनाची ज्याच्या अभिलेखात नोंदणी करण्यात आली असेल अशा नोंदणी प्राधिकरणाला किंवा केन्द्र शासन विहित करील अशा अन्य प्राधिकरणाला सूचित करील.
६) त्यावेली अंमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, या कलमाखाली विमाकार देत असलेले विमापत्र त्या विमापत्रात विनिर्दिष्ट केलेल्या अशा व्यक्तीच्या किंवा अशा वर्गातील व्यक्तींच्या बाबतीत ज्या दायित्वाबाबत क्षतिपूर्ती देण्याचे अभिप्रेत असेल आा कोणत्याही दायित्वाबाबत त्या व्यक्तीचे किंवा त्या वर्गातील व्यक्तीचे हानीरक्षण करण्यास दायी राहील.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply