मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ११ :
१.(त्रयस्थपक्षीय जोखमीबद्दल मोटार वाहनांचा विमा :
कलम १४५ :
व्याख्या :
या प्रकरणात –
(a)क) अ) प्राधिकृत विमाकार म्हणजे जो भारतामध्ये सर्वसाधारणपणे विमा व्यवसाय करतो आहे आणि ज्याला विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये स्थापित केलेल्या भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आणि साधारण विमा व्यवसायी (राष्ट्रीयीकरण) अधिनियम १९७२ अन्वये साधारण विमा व्यवसाय करण्यास प्राधिकृत कोणत्याही शासकीय विमा निधि द्वारा नोंदणी प्रमाणपत्र मंजुर केले आहे असा आहे.
(b)ख) ब) विमा प्रमाणपत्र याचा अर्थ, प्राधिकृत विमाकाराने कलम १४७ ला अनुसरुन दिलेले प्रमाणपत्र असा आहे; आणि त्यात विहित करण्यात येतील अशा आवश्यक गोष्टी पूर्ण करणारी उपरिटिप्पणी आणि विमापत्राच्या संबंधात एकाहून अधिक प्रमाणपत्रांची प्रत देण्यात आली असेल त्या बाबतीत ती सर्व प्रमाणपत्रे, किंवा प्रमाणपत्राची प्रत देण्यात आली असेला त्या बाबतीत प्रकरणपरत्वे, ती प्रत यांचा समावेश होतो;
(c)ग) क) घोर उपहति (गंभीर दुखापत) याचा अर्थ, जो भारतीय दंड संहिता १८६० याच्या कलम ३२० मध्ये जो आहे तोच;
(d)घ) ड) हिट एंड रन (धडक मारुन पळून जाणे) वाहन अपघात म्हणजे असा अपघात अभिप्रते आहे, जेथे अशा कोणत्याही वाहन किंवा वाहनांच्या वापराने अपघात झाला आहे, आणि युक्तियुक्त प्रयत्न करुनही मोटार वाहनांची ओळख पटली नसेल.
(e)ङ) ई) विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये स्थापित विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अभिप्रेत आहे;
(f)च) फ) विमापत्र यात विमा प्रमाणपत्राचा समावेश आहे;
(g)छ) ग) मालमत्ता यात, मोटार वाहनातून नेला जाणारा माल,प्रवाशांचे नेले जाणारे सामान, रस्ते, पूल, मोऱ्या, सेतूमार्ग, नाले, चौक्या व मैलाचे दगड यांचा समावेश होतो;
(h)ज) ह) देवाण घेवाण करणारा देश याचा अर्थ, देवाणघेवाणीच्या तत्वावर जो कोणताही देश या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी देवाणघेवाण करणारा देश म्हणून केन्द्र शासनाकडून शासकीय राजपत्रात अधिसूचित करण्यात येईल तो देश असा आहे;
(i)झ) आय) त्रयस्थ पक्ष यात शासन, चालक आणि माल वाहतूक वाहनावरील कोणताही इतर सहकर्मी यांचा समावेश आहे.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.