Mv act 1988 कलम १३९ : केंद्र शासनाचा नियम करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ९ :
भारतातून तात्पूरती बाहेर जाणारी किंवा तात्पुरती भारतात येणारी वाहने :
कलम १३९ :
केंद्र शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
१) केंद्र शासनाला राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी नियम करता येतील, ती प्रयोजने म्हणणे-
(a)क)अ) कोणतीही व्यक्ती भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मोटार वाहन तात्पुरते भारताबाहेर नेत असेल किंवा कोणतीही व्यक्ती भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तात्पुरती भारताबाहेर जात असेल आणि भारताबाहेर असताना मोटार वाहन चालविण्याची त्या व्यक्तीची इच्छा असेल, अशा बाबतीत अशा कोणत्याही व्यक्तीला प्रवासी पास, प्रमाणपत्रे किंवा प्राधिकारपत्रे देणे किंवा ती प्राधिकृत करणे;
(b)ख)ब) भारतात तात्पुरता मुक्काम करण्याचा उद्देश असणाऱ्या व्यक्तीने भारताबाहेरून तात्पुरते भारतात आणलेले मोटार वाहन ज्या शर्तींना अधीन राहून भारतात ताब्यात ठेवता येईल आणि वापरता येईल अशा शर्ती विहित करणे; आणि
(c)ग) क) भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून भारतात तात्पुरता प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला भारतातील तात्पुरत्या मुक्कामात ज्या शर्तींना अधीन राहून भारतात तात्पुरते वाहन चालविता येर्सल अशा शर्ती विहित करणे;
२) भारत आणि इतर कोणतीही देश यांच्या दरम्यान कोणत्याही परस्पर व्यवस्थेनुसार चालविण्यात येणारी आणि रस्त्यावरून भाड्याने किंवा मोबदल्यावर प्रवासी किंवा माल किंवा दोन्हीची वाहतूक करणारी मोटारवाहन सेवा सोयीची आणि विनियमित करण्याच्या प्रयोजनासाठी केंद्र शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी नियम करता येतील ती प्रयोजने म्हणजे-
(a)क)अ) अशा सेवा पार पाडणारी वाहने भारताबाहेरून भारतात ज्या शर्तींना अधीन राहून आणता येतील आणि ती भारतता ज्यांना अधिक राहून वापरता येतील अशा शर्ती.
(b)ख)ब) भारतातील कोणत्याही ठिकाणाहून भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी मोटार वाहने ज्या शतींवर नेता येतील त्या शर्ती;
(c)ग) क) मोटार वाहन भारतातील चालक किंवा वाहक म्हणून नेमण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्या शर्तींना अधीन राहून भारतात प्रवेश करता येईल किंवा भारताबाहे जाता येईल त्या शर्ती;
(d)घ) ड) अशा मोटार वाहनाचा चालक किंवा वाहक म्हणून नेमण्यात आलेल्या व्यक्तीला प्रवासासाठी पास, प्रमाणपत्रे किंवा प्राधिकार पत्रे देणे किंवा ती प्राधिकृत करणे;
(e)ड) ई) अशा मोटार वाहनांती प्रदर्शित करावयाचे तपशील (नोंदणी चिन्हाखेरीज अन्य) आणि असे तपशील ज्या रीतीने प्रदर्शित करावयाचे ती रीत;
(f)च) फ) अशा मोटार वाहनाबरोबर अनुयानाचा वापर करणे;
(g)छ)ग) अशा मोटार वाहनांना आणि त्यांच्या चालकांना व वाहकांना या अधियिमाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदींमधून पोट-कलम (४) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या असतील त्या वगळून किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांमधून सूट;
(h)ज) ह) अशा मोटार वाहनांच्या चालकांची आणि वाहकांची ओळख;
(i)झ) आय) हरविलेले किंवा खराब झालेले प्रवासी पास, प्रमाणपत्रे किंवा प्राधिकारपत्रे, परवाने, लायसने किंवा अन्य कोणतेही विहित करण्यात आलेले दस्तऐवज विहित करण्यात आलेली फी भरण्यात आल्यावर पुन्हा देणे;
(j)ञ)जे) अशा मार्ग परिवहन सेवा सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने कस्टम, पोलीस, किंवा आरोग्यविषयक कायद्यांशी संबंधित असतील अशा तरतुदींमधून सूट देणे;
(k)ट) के) विहित करावयाच्या किंवा विहित करता येतील अशा अन्य कोणत्याही बाबी;
३) या कलमान्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमामुळे कोणत्याही राज्यात मोटार वाहनावर बसविण्यात आलेल्या कोणत्याही कराचे त्या राज्यात प्रदान करण्यापासून कोणत्याही व्यक्तीला सूट मिळणार नाही.
४) या अधिनियमातील किंवा एखाद्या राज्य शासनाकडून त्याखाली करण्यात आलेल्या-
(a)क)अ) मोटार वाहनांची नोंदणी आणि ओळख; किंवा
(b)ख)ब) मोटार वाहनांची बांधणी, देखभाल आणि साधनसामग्री यासंबंधीच्या गरजा; किंवा
(c)ग) क) मोटार वाहनाच्या चालकांना आणि वाहकांना लायसन देणे आणि त्यांच्या अर्हता; या गोष्टीशी संबंधित, कोणतीही नियम-
एक) ज्यांना पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) च्या खंड (ब) किंवा खंड (क) अन्वये करण्यात आलेला कोणताही नियम प्रयुक्त असतो, अशा कोणत्याही मोटार वाहनाला किंवा कोणत्याही मोटार वाहन चालकाला; किंवा
दोन) पोट-कलम (२) नुसार करण्यात आलेला कोणताही नियम ज्याला प्रयुक्त असतो, अशा कोणत्याही मोटार वाहन वाहकाला, लागू असणार नाही.

Leave a Reply