मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३४ :
एखाद्या व्यक्तीला अपघात झाला असेल व इजा पोहोचली असेल अशा बाबतीत चालकाचे कर्तव्ये :
एखादे मोटार वाहन ज्या अपघातात गुंतलेले असेल, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या कोणत्याही मालमत्तेला इजा पोहोचली असेल. अशा बाबतीत त्या वाहनाच्या चालकाने किंवा ते वाहन ताब्यात असलेले व्यक्तीने –
(a)क) अ) लोकक्षोभांमुळे किंवा त्याच्या नियंत्रणाबाहेरच्या इतर कोणत्याही कारणामुळे त्याने तसे करणे व्यवहार्य नसेल, अशी प्रकरणे वगळून अन्य बाबतीत जखमी व्यक्तीला १.(सर्वात जवळच्या वैद्यक व्यवसायीकडे किंवा रूग्णालयात नेऊन) वैद्यकीय देखभाल प्राप्त करून देण्यासाठी सर्व वाजवी उपाय योजने पाहिजेत. १.(आणि जखमी व्यक्तीची ताबडतोब देखभाल करणे आणि कोणत्याही कार्यपद्धतीविषयक औपचारिकतांसाठी न थांबता त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत किंवा उपचार देणे हे प्रत्येक नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीचे किंवा रूग्णालयात त्या वेळी काम करीत असणाऱ्या डॉक्टरांचे कर्तव्य असेल) परंतु अशा जखमी व्यक्तीने, किंवा ती व्यक्ती अज्ञान असेल, अशा बाबतीत तिच्या पालकांनी अन्य प्रकारची इच्छा व्यक्त केलेली नसली पाहिजे.
(b)ख) ब) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केली असता त्याला आवश्यक असलेली माहिती दिली पाहिजे किंवा पोलीस अधिकारी उपस्थित नसेल, अशा बाबतीत घडलेल्या घटनेबाबतची माहिती आणि खंड (अ) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी आवश्यक ते वाजवी उपाय योजण्यात आले नसतील तर तसे न करण्यासंबंधीच्या परिस्थितीबाबतची माहिती सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्यावर लवकरात लवकर, आणि कोणत्याही परिस्थितीत अशी घटना घडल्यापासून चोवीस तासांच्या आत कळविली पाहिजे;
(c)ग) २.(क) विम्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या विमाकाराला अपघात घडल्यासंबंधीची माहिती लेखी स्वरूपात दिली पाहिजे, ती म्हणजे-
एक) विमा पॉलिसी क्रमांक आणि तिच्या वैधतेचा कालावधी;
दोन) अपघाताची तारीख, वेळ आणि ठिकाण;
तीन) अपघातामध्ये जखमी किवा मृत झालेल्या व्यक्तीसंबंधीचे तपशील;
चार) चालकाचे नाव, आणि त्याच्या चालकाच्या लायसनाचे तपशील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, चालक या संज्ञेमध्ये वाहनाच्या मालकाचा समावेश होतो.)
——–
१. १९९४ चा अधिनियम ५४ याच्या कलम ४१ (क) द्वारे मूळ खंड (अ) मधील आणि आवश्यकता असल्यास त्या व्यक्तीला सर्वात जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे लागेल या मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले. (१४ नोव्हेंबर १९९४ पासून)
२. १९९४ चा अधिनियम ५४ याच्या कलम ४१ (क) द्वारे समाविष्ट करण्यात आले.