Mv act 1988 कलम १३२ : विशिष्ट प्रकरणी थांबणे हे चालकाचे कर्तव्य :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३२ :
विशिष्ट प्रकरणी थांबणे हे चालकाचे कर्तव्य :
१) मोटार वाहनाचा चालक –
(a)क) १.(अ) ते वाहन एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला किंवा वाहनाला झालेल्या अपघातात गुंतलेले असेल, अशा वेळी पोलीस फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नाही अशा कोणत्याही गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने तसे करण्यास फर्माविले असेल अशा वेळी; किंवा )
(b)ख) ब) एखादे जनावर ताब्यात असलेल्या व्यक्तीला ते जनावर अनावर झाले असावे किंवा वाहनामुळे भयभित होऊन ते अनावर होईल अशी धास्ती वाटल्यावरुन तिने त्या चालकाला तसे सांगितले असता; किंवा
२.(***)
मोटार थांबवण्याची आणि १.(आवश्यक ठरेल अशा, परंतु चोवीस तासांपेक्षा अधिक नाही इतक्या कालावधीसाठी) वाहन उभे करून ठेवण्याची व्यवस्था करील आणि त्याने स्वत:चे नाव आणि पत्ता आणि त्या वाहनाच्या मालकाचे नाव आणि पत्ता या अपघाताची बाधा पोहोचलेल्या किंवा जिला, नुकसान पोहोचले आहे आणि तिने भरपाईची मागणी केली आहे, अशा व्यक्तीला दिला पाहिजे व त्या व्यक्तीनेही आपले नाव व पत्ता दिला पाहिजे.
२) आपले नाव व पत्ता देणाऱ्या आणि मोटार वाहनाच्या चालकाने कलम १८४ नुसार शिक्षायोग्य असलेला अपराध केला आहे असा आरोप करणाऱ्या व्यक्तीने मागणी केली असता मोटार वाहनाच्या चालकाने आपले नाव व पत्ता या व्यक्तीला दिला पाहिजे.
३) या कलमान्वये, प्राणी या शब्दाचा अर्थ-घोडा, गुरे, हत्ती, उंट गाढव, खेचर, मेंढी व बकरी असा आहे.
——-
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ४० अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ४० अन्वये वगळण्यात आले.

Leave a Reply