Mv act 1988 कलम १३१ : संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडणीच्या ठिकाणी विशिष्ट सावधगिरी घेण्याचे चालकाचे कर्तव्य :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३१ :
संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडणीच्या ठिकाणी विशिष्ट सावधगिरी घेण्याचे चालकाचे कर्तव्य :
संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडणीजवळ पोहोचलेल्या प्रत्येक मोटार चालकाने आपले वाहन थांबविले पाहिजे आणि वाहनाच्या चालकाने वाहनाच्या वाहकाला, स्वच्छकाला (क्लीनर) किंवा परिचराला वाहनातील अन्य कोणत्याही व्यक्तीला रेल्वे रूळ ओलांडणीजवळ जाण्यास आणि रूळाच्या दोन्ही बाजूंनी कोणतीही व्यक्तीला रेल्वे रूळ ओलांडणीजवळ जाण्यास आणि रूळाच्या दोन्ही बाजूंनी कोणतीही रेल्वे किंवा ट्रॉली येत नसल्याची खात्री करून घेण्यास सांगितले पाहिजे, आणि त्यानंतर अशा रेल्वे किंवा ट्रॉली येत नसल्याची खात्री करून घेण्यास सांगितले पाहिजे, आणि त्यानंतर अशा रेल्वे रूळ ओलांडणीवरून वाहन नेले पाहिजे आणि वाहनात वाहक किंवा स्वच्छक किंवा परिचर किंवा अन्य कोणतीही व्यक्ती उपलब्ध नसेल, अशा बाबतीत रेल्वे रूळ ओलांडण्यापूर्वी मोटार वाहनाच्या चालकाने स्वत: वाहनातून उतरून रूळांच्या दोन्ही कोणतीही रेल्वे गाडी किंवा ट्रॉली येत नसल्याची खात्री करून घेतली पाहिजे.

Leave a Reply