Mv act 1988 कलम १२९ : १.(संरक्षक शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२९ :
१.(संरक्षक शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरणे :
सार्वजनिक ठिकाणी, कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्णनाच्या मोटार साइकल वाहन चालविणाऱ्या किंवा त्यावर बसून जाणाऱ्या चार वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीने केन्द्र शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या अशा मानकांना अनुसरुन शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरले पाहिजे :
परंतु, एखादी व्यक्ती शीख असून, तिने सार्वजनिक ठिकाणी मोटार सायकल चालवत असाताना तीवर बसून जात असताना फेटा बांधलेला असेल तर या कलमाचे उपबंध तिला लागू होणार नाहीत :
परंतु आणखी असे की केन्द्र शासन नियमांद्वारे, मोटार सायकलवरुन नेत असलेल्या चार वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपबंध करु शकेल.
स्पष्टीकरण :
संरक्षक शिरोवेष्टन (हेल्मेट) याचा अर्थ, जे शिरस्त्राण-
(a)क) अ) त्याचा आकार, सामग्री व बनावट यामुळे मोटार सायकल चालवणाऱ्या किंवा तीवर बसून जाणाऱ्या व्यक्तीला अपघात झाल्यास इजा होण्यापासून काही प्रमाणात संरक्षण देईल अशी वाजवी अपेक्षा करता येते ; आणि
(b)ख) ब) त्याला जोडलेल्या पट्ट्याच्या किंवा इतर बंधांच्या सहाय्याने ते परिधान करणाऱ्याच्या डोक्याला पक्के बांधलेले असते;
असे शिरस्त्राण (हेल्मेट), असा आहे.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४४ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply