Mv act 1988 कलम १२४ : पास किंवा तिकिटाखेरीज प्रवास करण्यास प्रतिबंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२४ :
पास किंवा तिकिटाखेरीज प्रवास करण्यास प्रतिबंध :
कोणत्याही व्यक्तीने तिच्याकडे योग्य तो पास किंवा तिकिट असल्याखेरीज कोणत्याही टप्पा वाहनामध्ये प्रवास करण्याच्या हेतूने प्रवेश करता कामा नये किंवा त्यामध्ये राहता कामा नये;
परंतु एखाद्या व्यक्तीला ज्या वाहनामधून प्रवास करावयाचा असेल, त्या वाहनातच तिकीट देण्याची व्यवस्था करण्यात आलेली असेल, अशा बाबतीत त्या व्यक्तीला अशा टप्पा वाहनामध्ये प्रवेश करता येईल. परंतु अशा प्रकारे प्रवेश करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्याने वाहकाकडे किंवा वाहकाचे कर्तव्य पार पाडीत असेल, अशा चालकाकडे भाड्याचे पैसे दिले पाहिजेत आणि यथास्थिती वाहकाकडून किंवा चालकाकडून प्रवासाचे तिकिट घेतले पाहिजे.
स्पष्टीकरण :
या कलमामध्ये –
(a)क)अ) पास याचा अर्थ ज्या व्यक्तीला पास देण्यात आलेला असतो, अशा व्यक्तीला टप्पा वाहनातून विनामुल्या प्रवास करण्याचा अधिकार प्रदान करणारा कर्तव्यार्थ, विशेषाधिकार किंवा सौजन्यपास असा होता आणि त्यामध्ये, पासमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या कालावधीसाठी टप्पा वाहनामधून प्रवास करण्यासाठी प्रदान करण्यात आल्यावर देणाऱ्या पासाचा समावेश होतो.
(b)ख)ब) तिकीट यामध्ये, एकेरी तिकीट, परतीचे तिकीट किंवा सिझन तिकीट यांचा समावेश होतो.

Leave a Reply