मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२३ :
पायफळी इत्यादीवर उभे राहून प्रवास करणे :
१) मोटार वाहन चालविणारी किंवा तीवरी जिचा प्रभार आहे अशी कोणताही व्यक्ती, जर कोणी पायफळीवर उभे राहिले असेल किंवा वाहनाच्या आतल्या अंगाला नसेल तर, अशा कोणाही व्यक्तीची वाहतूक करु शकणार नाही किंवा तशी वाहतूक करु देणार नाही.
२) कोणत्याही व्यक्तीस मोटार वाहनाच्या पायफळीवरुन किंवा टपावरुन किंवा बॉनेटवरुन प्रवास करता येणार नाही.