मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२२ :
वाहन धोकदायक अवस्थेत सोडून देणे :
मोटार वाहन ताब्यात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ते मोटार वाहन किंवा कोणतेही अनुयान कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, त्या जागेच्या अन्य वापरदारांना किंवा प्रवाशांना धोका निर्माण करील, अडथळा निर्माण करील किंवा अनावश्यक गैरसोय निर्माण करील, अशा पद्धतीने किंवा अशा स्थितीत किंवा अशा परिस्थितीमध्ये सोडून देता कामा नये किंवा राहू देता कामा नये किंवा तसे करण्यास परवानगी देता कामा नये.