मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११७ :
वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :
राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केले असेल, अशा अन्य प्राधिकरणाला, संबंधित क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून, जेथे मोटार वाहने एकतर अनिश्चित काळापर्यंत किंवा विनिर्दिष्ट कालावधीसाठी उभी करता येतील अशा जागा निश्चित करता येतील आणि जेथे प्रवाशांना उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी जेवढा वेळ आवश्यक असतो, त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी लोक सेवा वाहने थांबवता येतील अशा जागा निश्चित करता येतील :
१.(परंतु राज्य शासन किंवा प्राधिकृत प्राधिकरण अशी ठिकाणे निश्चित करताना, रस्ता वापरणाच्यांच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीच्या मुक्त प्रवाहाला प्रथम प्राधान्य देईल :
परंतु आणखी असे की, या कलमाच्या प्रयोजनासाठी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिनियम १९८८ अन्वये स्थापन केलेले भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण किंवा केन्द्र शासन द्वारा प्राधिकृत इतर अन्य अभिकरण सुद्धा अशी ठिकाणे निश्चित करु शकेल.)
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४३ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.