Mv act 1988 कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११४ :
वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :
१)१.(२.(राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या मोटार वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा अन्य व्यक्तीस) जर कोणतेही मालवाहू वाहन किंवा ट्रेलर (अनुयान) कलम ११३ चे व्यतिक्रमण करुन वापरण्यात येत आहे असे सकारण वाटत असेल तर,) ती व्यक्ती, चालकाला ते वाहन, वजन करण्यासाठी पुढील मार्गावरील कुठल्याही स्थानबिंदूपासून दहा किलोमीटर अंतराच्या आत किंवा वाहनाच्या नियत स्थळापासून वीस किलोमीटर अंतराच्या आत कोणताही वजनकाटा असल्यास तिकडे, नेण्यास सांगू शकेल, आणि असे वजन करण्यात आल्यावर वजनासंबंधीच्या कलम ११३ च्या उपबंधाचे त्या वाहनाने व्यतिक्रमण केले आहे असे आढळून आल्यास, तो व्यक्ती लेखी आदेशाद्वारे त्या चालकाला असे निदेशित करु शकेल की, तो जास्तीचा भार त्याने स्वत:च्या जोखमीवर कमी करावा आणि लादलेला असा माल कमी करेपर्यंत किंवा त्याने कलम ११३ चे अनुपालन होईल अशा प्रकारे वाहनाच्या किंवा ट्रेलरच्या संबंधात अन्यथा कार्यवाही केल्याखेरीज ते वाहन अथवा ट्रेलर त्या जागेपासून हलवू नये आणि तशी सूचना मिळाल्यावर चालकाला अशा निदेशांचे पालन करावे लागेल.
२) पोटकलम (१) खाली प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने, जर उपरोक्त आदेश लेखी दिला असेल तर, तो अशा अधिक भाराचा संबद्ध तपशील मालवाहन परवान्यावर पृष्ठांकितही करील आणि ज्या प्राधिकरणाद्वारे तो परवाना देण्यात आला आहे त्या अशा पृष्ठांकनाच्या वस्तुस्थिती विषयीदेखील कळवील.
———
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३५ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४१ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply