Mv act 1988 कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११३ :
वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :
१) राज्य शासनाला राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १.(परिवहन वाहनांसाठी) परवाने देण्याच्या संबंधात शर्ती विहित करता येतील आणि कोणत्याही क्षेत्रात किंवा मार्गावर अशा वाहनांच्या वापराला प्रतिबंध करता येईल किंवा त्यावर निर्बंध घालता येईल.
२) अन्य प्रकारे विहित करण्यात आले असेल ते वगळता कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी हवा भरल्यामुळे चालणारे टायर न बसविण्यात आलेले कोणतेही मोटार वाहन चालविता कामा नये किंवा चालविण्यास भाग पाडता कामा नये किंवा त्यासाठी परवानगी देता कामा नये.
३) कोणत्याही व्यक्तीने-
(a)क)अ) वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रात विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या भारविरहित वजनापेक्षा अधिक असेल असे भारविरहित वजन असलेले; किंवा
(b)ख)ब) वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या स्थूल वाहन वजनापेक्षा अधिक भारयुक्त वजन असणारे, कोणतेही मोटार वाहन किंवा अनुयान सार्वजनिक ठिकाणी चालविता कामा नये किंवा चालविण्यास भाग पाडता कामा नये किंवा तशी परवानगी देता कामा नये.
४) पोट-कलम (२) किंवा पोट-कलम (३) चा खंड (अ) चे उल्लंघन करून चालविण्यात आलेल्या मोटार वाहनाचा चालक किंवा त्याची प्रभारी व्यक्ती ही त्या वाहनाची मालक नसेल, अशा बाबतीत, असा अपराध त्या मोटार वाहनाच्या किंवा अनुयानाच्या मालकाला माहीत असताना करण्यात आला आहे किंवा अशा मालकाच्या आदेशानुसार तो करण्यात आला आहे असे न्यायालय गृहीत धरू शकेल.
———
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply