Mv act 1988 कलम ११० : नियम करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११० :
नियम करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार :
१) केन्द्र शासन, मोटार वाहने आणि अनुवाहने यांची बांधणी करणे, ती सुसज्ज करणे आणि त्यांची देखभाल करणे याबाबत नियमन करणाऱ्या पुढील सर्व अथवा कोणत्याही बाबींसाठी नियम करील. त्या बाबी अशा :-
(a)क) अ) वाहनांची आणि वाहून नेल्या जाणाऱ्या भारांची रुंदी, उंची, लांबी आणि वरपसारा;
(b)ख) १.(ब) टारयांचे आकारमान, स्वरुप, कमाल किरकोळ किंमत आणि टायरांची स्थिती आणि त्यावर उमटवावयाची निर्मितीची तारीख व वर्ष, आणि वजन वाहून नेण्याची कमाल क्षमता;)
(c)ग) क)ब्रेक व स्टीयरिंग गियर;
(d)घ) ड)रंगीत सरंक्षक काचांच्या वापरावरील प्रतिषेधकासह संरक्षक काचांचा वापर;
(e)ड) इ)संकेतन उपयंत्रे, दिवे व परावर्तक;
(f)च)फ)वेग नियामके;
(g)छ) ग)धूर, दृश्यमान वाफ, ठिणग्या, राख, रेवाळ किंवा तेल बाहेर टाकले जाणे;
(h)ज) ह)वाहनांतून किंवा वाहनांमुळे निर्माण होणारा आवाज कमी करणे;
(i)झ)आय) न्याधार क्रमांक (चेसिस क्रमांक), इंजिन क्रमांक आणि उत्पादनाची तारीख उमटरेखित करणे;
(j)ञ) ज)सुरक्षा पट्टे, मोटार सायकलींच्या मुठीचे दांडे, ऑटो डिप्पर आणि वाहनचालक प्रवासी व रस्त्त्याचा वापर करणाऱ्या इतरांच्या सुरक्षिततेकरता आवश्यक अशी इतर साधने;
(k)ट) के)वाहनात सुरक्षा साधने म्हणून वापरलेल्या घटकांचा दर्जा २.(सॉफ्टवेअरसह)
(l)ठ) ल)मानवी जीविताच्या दृष्टीने हानीकारक अथवा धोकादायक असेल अशा मालाच्या परिवहनाचे उपबंध;
(m)ड) म)हवा प्रदूषित करणाऱ्या उत्सर्गाकरता मानके;
(n)ढ) १.(न)विहित करण्यात येईल त्या वर्गाच्या वाहनात उत्प्रेरण परिवर्तक (कॅटॅलिक कन्व्हर्टर) बसविणे;
(o)ण) ओ)सार्वजनिक वाहनांमध्ये दृकश्राव्य (ऑडियो व्हिज्युअल) किंवा रेडियो अथवा टेपरेकॉर्डर्स यांसारखी उपकरणे बसविणे;
(p)त) पी)वाहनाच्या विक्रीनंतरची हमी व त्याबाबतच्या शर्ती 🙂
परंतु, पर्यावरणाच्या रक्षणाशी संबंधित अशा बाबींच्या संबंधातील कोणतेही नियम, शक्य होईल तितपत, भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाशी विचारविनिमयानंतर करण्यात येतील.
२)पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या बाबींचे नियमन करण्यासाठी नियम करता येतील आणि त्यामध्ये अशा बाबींचे अनुपालन केले जाते आहे याची खात्री करुन घेण्याची रीत आणि सरसकट मोटार वाहने किंवा अनुवाहने यांच्यासंबंधात अथवा विशिष्ट वर्गाची मोटार वाहने किंवा अनुवाहने यांच्यासंबंधात किंवा विशिष्ट परिस्थितीत, ३.(आणि अशा नियमांमध्ये तपासाची प्रक्रिया, असा तपास करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांना अधिकार दिले असतील त्यांनी अशा बाबतीत म्हणणे ऐकून घेण्याची पद्धत आणि त्याखाली देण्यात येणारा दंड), मोटार वाहनांची देखभाल करणे या बाबींचा समावेश असेल.
४.(२अ) पोटकलम (२) अन्वये अधिकार असलेल्या व्यक्तीला पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या तपासाच्या पद्धतीसाठी दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ अन्वये निम्नलिखित बाबीं संबंधित दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील, अर्थात :-
(a)क) अ) कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठविणे आणि हजर करणे आणि शपथे (प्रतिज्ञेवर) त्याची चौकशी करणे;
(b)ख) ब) कोणत्याही दस्तऐवजांची मागणी करणे आणि ते सादर करण्याची अपेक्षा करणे;
(c)ग) क) शपथेवर पुरावा मिळविणे; आणि
(d)घ) ड) इतर अन्य बाब, जी विहित केली जाईल.)
३) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी,
(a)क) अ) केन्द्र शासन, कोणत्याही वर्गाच्या मोटार वाहनांना या प्रकरणाच्या उपबंधांपासून सूट देऊ शकेल.
(b)ख) ब) केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, एखादे राज्य शासन, कोणत्याही मोटार वाहनास अथवा कोणत्याही वर्गाच्या अथवा वर्णनाच्या मोटार वाहनास पोटकलम (१) खाली करण्यात आलेल्या नियमांपासून सूट देऊ शकेल.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमाकं ५४ याच्या कलम ३२ अन्वये मूळ मजकूराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply