Mv act 1988 कलम ११०अ (क): १.(मोटार वाहनांना परत मागविणे:

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११०अ (क):
१.(मोटार वाहनांना परत मागविणे:
१) केन्द्र शासन, आदेशाद्वारे, एखाद्या निर्मात्याला विशिष्ट प्रकारच्या किंवा रुपांच्या मोटार वाहनांना परत मागवण्याचे निर्देश देऊ शकेल, जर
(a)क)अ) त्या विशिष्ट प्रकारच्या मोटार वाहनांमध्ये असा दोष असेल जो पर्यावरणास हानी पोहचवित असेल किंवा मोटार वाहनाच्या चालकास किंवा त्यामध्ये बसणाऱ्या व्यक्तिंना किंवां रस्त्त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तिंना हानी पोहचवित असेल; आणि
(b)ख)ख) त्या विशिष्ट प्रकारच्या मोटार वाहनांमध्ये निम्नलिखित असा दोष असेल त्याचा केन्द्र शासनाला अहवाल दिला असेल –
एक) केन्द्र शासन राजपत्रात अधिसूचनेद्वारे अशा मालकांची टक्केवारी विनिर्दिष्ट करेल; किंवा
दोन) चाचणी एजन्सी; किंवा
तीन) अन्य कोणताही मार्ग (स्त्रोत).
२) पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे मोटार वाहनाच्या कोणत्याही संघटकात (कॉम्पोनन्टस्मध्ये) दोष आढळून आल्यास, केन्द्र शासन, निर्माणकत्र्याला आदेशद्वारे, अशा मोटार वाहनांचा प्रकार किंवा त्या वाहनांचे टप्पे यांचा विचार न करता, ज्यामध्ये असा संघटक (कॉम्पोनन्ट) लावलेला आहे, परत बोलावण्याचा निदेश देईल.
३) पोटकलम (१) व पोटकलम (२) अन्वये ज्या निर्माणकत्र्यांची मोटार वाहने परत मागवली असतील, त्यांनी –
(a)क)अ) खरेदीदारांना कोणत्याही भोडे कराराला (हायर परचेस) किंवा भाडेतत्वावरील गृहीतक कराराला (लीज हायपोथीकेशन) अनुसरुन मोटारवाहनाची संपूर्ण किंमत परत करावयास हवी; किंवा
(b)ख)ब) या अधिनियमान्वये विनिर्दिष्ट मानकांचे अनुपालन करुन दोषपूर्ण मोटार वाहनाला समान किंवा चांगल्या वैशिष्टांच्या मोटार वाहनामध्ये बदलेल किंवा त्याची दुरुस्ती करेल; आणि
(c)ग) क) पोटकलम (६) अन्वये दंड आणि इतर देय देईल.
४) ज्यावेळेस निर्माणकत्र्याला त्याने निर्माण केलेल्या मोटार वाहनामध्ये दोष आढळून आला तर निर्माणकर्ता त्या दोषाबाबत केन्द्र शासनाला कळवेल आणि मोटार वाहनांना परत बोलावण्यास सुरवात करील आणि अशा बाबतीत पोटकलम (३) अन्वये निर्माणकर्ता दंड देण्यास पात्र असणार नाही.
५) केन्द्र शासन या कलमाअन्वये कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशी करण्यासाठी प्राधिकृत करु शकेल व तपासाच्या पद्धतीसाठी दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ अन्वये निम्नलिखित बाबीं संबंधित दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील, अर्थात :-
(a)क)अ) कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठविणे आणि हजर करणे आणि शपथे (प्रतिज्ञेवर) त्याची चौकशी करणे;
(b)ख)ब) कोणत्याही दस्तऐवजांची मागणी करणे आणि ते सादर करण्याची अपेक्षा करणे;
(c)ग) क) शपथेवर पुरावा मिळविणे; आणि
(d)घ) ड) इतर अन्य बाब, जी विहित केली जाईल.
६) केन्द्र शासन, मोटार वाहनाचे विशिष्ट प्रकार किंवा त्यांचे भिन्न प्रकार यांमध्ये केन्द्र शासनाच्या मते कोणतेही दोष असतील असे असल्यास अशा दोषामुळे पर्यावरण किंवा मोटार वाहनाचा चालक किंवा त्यामध्ये बसणाऱ्या व्यक्ती किंवा रस्ता वापरणाऱ्या अन्य व्यक्ती हानी पोहचवू शकेल, तर अशा बाबतीत विनियमन करण्यासाठी निमय करु शकेल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४० अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply