मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०७ :
नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
१) या प्रकरणाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येईल.
२) विशेषत: आणि पूर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतुदी करता येतील-
(a)क)अ) कलम ९९ नुसार एखाद्या योजनेच्या संबंधातील प्रस्ताव ज्या नमुन्यात प्रसिद्ध करता येईल तो नमुना :
(b)ख)ब) कलम १००, पोट-कलम (१) खाली आक्षेप ज्या रीतीने प्रसिद्ध करता येतील ती रीत:
(c)ग) क) कलम १००, पोट-कलम (१) नुसार ज्या रीतीने आक्षेप विचारात घेण्यात आणि निकालात काढण्यात येतील ती रीत,
(d)घ) ड) कलम १००, पोट-कलम (३) नुसार कोणतीही मान्य योजना ज्या नमुन्यात प्रसिद्ध करता येईल तो नमुना;
(e)ड)ई) कलम १००, पोट-कलम (१) नुसार ज्या रीतीने अर्ज करता येईल ती रीत;
(f)च) फ) कोणत्याही परिवहन वाहनात राहून गेलेल्या वस्तूची तिच्या मालकाला कलम १०६ नुसार ज्या कालावधीत मागणी करता येईल तो कलावधी, आणि अशा वस्तुंची विक्री करण्याची रीत;
(g)छ)ग) या प्रकरणाखाली आदेश बजावण्याची रीत;
(h)ञ)ह) विहीत करावयाच्या विहित करता येतील अशा इतर कोणत्याही बाबी;