मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०५ :
नुकसान भरपाई निर्धारित करण्याची तत्त्वे, पद्धती व प्रदान :
१) कलम १०३, पोट-कलम (२) च्या खंड (ब) किंवा (क) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कोणताही विद्यमान परवाना रद्द करण्यात आलेल्या आला असेल किंवा त्याच्या शर्तींमध्ये फेरबदल करण्यात आले असतील, अशा बाबतीत राज्य परिवहन उपक्रमाकडून परवानाधारकाला भरपाई देण्यात येईल व त्याची रक्कम पोट-कलम (४) किंवा यथास्थिती पोट-कलम (५) च्या तरतुदींनुसार निर्धारित करण्यात येईल.
२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा प्रकरणपरत्वे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मूळ परवान्याऐवजी पर्यायी मार्गाकरिता किंवा क्षेत्राकरिता परवाना देऊ केला असेल आणि परवाना धारकाने तो स्वीकारला असेल, तर त्याबद्दल भरपाई द्यावी लागणार नाही.
३) शकांनिरसनासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येत आहे की, कलम १०३, पोट-कलम (२) च्या खंड (अ) नुसार परवान्याचे नवीकरण करण्याचे नाकारण्यात आल्याबद्दल कोणतीही भरपाई देय असणार नाही.
४) कलम १०३, पोट-कलम (२) चा खंड (ब) किंवा खंड (क) चा उपखंड (एक) किंवा उपखंड (दोन) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकरांचा वापर करून कोणताही विद्यमान परवाना अशा प्रकारे रद्द करण्यात आला असेल, की ज्यामुळे एरवी ज्यामुळे एरवी ज्या कलावधीसाठी त्याद्वारे प्राधिकृत करण्यात आलेले कोणतेही वाहन वापरणे अन्यथा परिणामकारक असले असले, अशा संपूर्ण कालावधीसाठी त्यापरवानाधारकाला ते वापरण्यासाठी प्रतिबंध होत असेल तर अशा रद्द करण्यामुळे किंवा फेरबदलामुळे ज्यांच्यावर परिणाम होतो अशा प्रत्येक वाहनाच्या परवाना धारकाला देय असलेली कारवाई पुढीलप्रमाणे मोजण्यात येईल ती म्हणजे-
(a)क) अ) परवान्याच्या समाप्त न झालेल्या कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी किंवा पंधरा दिवसांपेक्षा अधिक असेल, अशा महिन्याच्या भागासाठी दोनशे रूपये;
(b)ख) ब) परवान्याच्या समाप्त न झालेल्या कालावधीतील पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा नसेल अशा महिन्यांच्या प्रत्येक भागासाठी-शंभर रूपये;
परंतु, कोणत्याही बाबतीत भरपाईची रक्कम चारशे रूपयांपेक्षा कमी असणार नाही.
५) कलम १०३, पोट-कलम (२) च्या खंड (क) चा उपखंड (तीन) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, विद्यमान परवान्यांमध्ये वापरण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही मोटार वाहनाच्या क्षेत्रात किंवा मार्गात कपात करण्यात येईल, अशा रीतीने विद्यमान परवान्यांच्या शर्तींमध्ये फेरबदल करण्यात आला असेल, अशा बाबतीत अशा कपातीच्या कारणासाठी त्या परवाना धारकाला देय असणारी भरपाईची रक्कम पुढील सूत्रानुसार मोजण्यात आलेली रक्कम असेल.
य * अ
—–
र
स्पष्टीकरण :
या सूत्रामध्ये –
एक) य म्हणजे परवान्यामध्ये अंतर्भूत असलेला मार्गाची किंवा क्षेत्राची जितक्या लांबीची किंवा क्षेत्राची कपात करण्यात आली असेल ती लांबी किंवा क्षेत्र;
दोन) अ म्हणजे, पोट-कलम (४) नुसार मोजण्यात आलेली रक्कम;
तीन) र म्हणजे परवान्यामध्ये अंतर्भूत असलेल्या मार्गाची एकूण लांबी किंवा एकूण क्षेत्र;
६) या कलमान्वये देय असलेली भरपाईची रक्कम ती मिळवण्यास हक्कदार असणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना राज्य परिवहन उपक्रमाकडून, परवाना रद्द करणष किंवा त्याच्यातील फेरबदल ज्या तारखेला परिणामकारक होतील त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत देण्यात येतील;
परंतु, सदर एक महिन्याच्या कालावधीत असे प्रदान करण्यात राज्य परिवहन उपक्रमाने कसूर केल्यास, त्याने, अशी रक्कम देय झाल्याच्या तारखेपासून दरसाल सात टक्के दराने व्याज दिले पाहिजे.