मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०२ :
योजना रद्द करणे किंवा तिच्यात फेरबदल करणे :
१) लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक आहे असे राज्य शासनाला वाटत असल्यास राज्य शासन कोणत्याही वेळी-
एक) राज्य परिवहन उपक्रम; आणि
दोन) राज्य शासनाच्या मते, जिच्यावर प्रस्तावित बदलामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे अशी कोणतीही इतर व्यक्ती.
यांना प्रस्ताविक बदलाबदल त्यांचे मत मांडण्याची संधी दिल्यांनतर कोणत्याही मान्य योजनेत बदल करू शकेल.
२) पोट-कलम (१) खालील कोणताही प्रस्तावित बदल, राज्य शासन शासकीय राजपत्रात आणि अशा फेरबदलामध्ये अंतर्भूत करावयाच्या क्षेत्रामध्ये प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील किमान एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करील आणि त्या तारखेसह अशा शासकीय राजपत्रातील प्रसिद्धीच्या तारखेपासून तीस दिवसांपेक्षा आधीची नसेल, अशा ज्या तारखेला राज्य शासन या बाबतीत आलेल्या कोणत्याही अभिवेदनांची सुनावणी करील अशी तारीख सुनावणीची वेळ व सुनावणीचे ठिकाण प्रसिद्ध करील.