मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०१ :
विवक्षित परिस्थितीत राज्य परिवहन उप्रकमाने जादा सेवा चालविणे :
कलम ८७ मध्ये काहीही अंतर्भूत असले, तरीही राज्य परिवहन उपक्रमाला लोकहितासाठी, जत्रा आणि धार्मिक मेळष यासारख्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणाहून परत येणे यासारख्या खास प्रसंगी प्रवाशांची ने-आण करण्यासाठी जादा सेवा चालविता येतील.
परंतु असे की, राज्य परिवहन उपक्रम अशी अतिरिक्त सेवा चालू केल्यासंबंधीची माहिती संबंधित परिवहन प्राधिकरणाला विनाविलंब कळवील.