बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९९ :
सर्व अहवाल गोपनिय समजणे :
१) बालकासंबंधी असलेले आणि मंडळ किंवा समितीने विचारात घेतलेले सर्व अहवाल गोपनीय समजले जाईल :
परंतु असे की, सथास्थिती, समिती किंवा मंडळ, त्यांना योग्य वाटल्यास अहवालाचा तपशिल दुसऱ्या समिती किंवा मंडळास किंवा बालकाचे माता पिता किंवा पालकास देऊ शकतील किंवा अहवालाच्या विषयाबाबत साक्ष देतांना सांगू शकतील.
२) या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, अपराधातील पीडित व्यक्तीस प्रकरणाच्या तपशिलापासून, त्यातील आदेश आणि इतर संबंधित अभिलेखपासून वंचित ठेवले जाणार नाही.