JJ act 2015 कलम ९८ : संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९८ :
संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती :
१) यथास्थिती, समिती किंवा मंडळ, एखादी परीक्षा किंवा नातेवाईकांचे लग्न, जवळच्या नातेवाईकाचा मृत्यु किंवा अपघात किंवा मातापित्यांचा गंभीर आजार किंवा नैसर्गिक आपत्ती या कारणांसाठी प्रवासाचा कालावधी वगळून सात दिवसांपेक्षा जास्त नाही अशा कालावधीसाठी संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास संस्था सोडण्याची परवानगी देऊ शकेल.
२) उपरोक्त नमूद आदेशाच्या अनुषंगाने जेवढ्या कालावधीसाठी बालक संस्थेतून गैरहजर असेल तेवढा काळ जास्त तो संस्थेत ठेवण्यास लायक ठरेल.
३) रजेचा कालावधी संपल्यावर जर बालकाने, बाल गृह किंवा विशेष गृहात पुन्हा हजर होण्यास नकार दिला किंवा तो वेळेवर पुन्हा हजर राहू शकला नाही तर समिती किंवा मंडळ त्याला ताब्यात घेऊन संस्थेत पुन्हा हजर करण्यास लायक ठरवू शकेल :
परंतु असे की, कायद्याचे उल्लंघन केलेले बालक रजेचा कालावधी संपल्यावर किंवा रजा रद्द केल्यावरही विशेष गृहात हजर झाला नाही, त्याला संस्थेत ठेवण्याचा कालावधी, जितका काळ तो गैरहजर होता तेवढ्या काळाने वाढविण्यचा आदेश मंडळ देऊ शकेल.

Leave a Reply