JJ act 2015 कलम ९७ : एखाद्या संस्थेमधून बालकाची सुटका करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९७ :
एखाद्या संस्थेमधून बालकाची सुटका करणे :
१) जेव्हा एखाद्या बालकास बालक गृहात किंवा विशेष गृहात ठेवलेले असेल तर, परीविक्षा अधिकाऱ्यांच्या किंवा सामाजिक कार्यकत्र्यांच्या किंवा सरकारच्या किंवा सेवाभावी स्वयंसेवी अशासकीय संस्थेच्या अहवालावर समिती किंवा मंडळ बालकास पूर्णपणे किंवा त्यांना योग्य वाटतील अशा शर्तींवर बालकाला माता पित्यांसोबत किंवा पालकांसोबत किंवा आदेशात नामनिर्देशित केलेल्या, बालकाचा ताबा, शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या अधिकृत व्यक्तीकडे राहण्यासाठी मुक्त करण्याचे आदेश देऊ शकेल :
परंतु असे की, या कलमान्वये काही शर्तीवर मुक्त केलेले बालक किंवा ज्याच्या ताब्यात बालकास सोपविले आहे अशा व्यक्तीने शर्तीचा भंग केल्यास, आवश्यक वाटल्यास समिती किंवा मंडळ बालकास पुन्हा ताब्यात घेण्याचे व मूळ संस्थेत परत पाठविण्याचे आदेश देऊ शकेल.
२) जर बालकास तात्पुरत्या स्वरुपात मुक्त केलेले असेल, तेव्हा पोट-कलम (१) मधील आदेशाच्या अनुषंगाने जेवढा काळ सदर बालक संबंधित संस्थेत नसेल तेवढा काळ तो बाल गृहात किंवा विशेष गृहात ठेवण्यात पात्र ठरेल :
परंतु असे की, कायद्याचे उल्लंघन केलेले बालक, पोट-कलम (१) अन्वये मंडळाने घातलेल्या शर्तीचा भंग करील तर आणखी जेवढा काळ तो संस्थेत व्यतित करण्यास बांधील असेल तो काळ मंडळाच्या आदेशाने, जेवढ्या काळासाठी तो मुक्त होता, तेवढा काळ वाढवला जाईल.

Leave a Reply