JJ act 2015 कलम ९६ : बालकाचे भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील बालगृहांमध्ये किंवा विशेष गृहांमध्ये किंवा सुयोग्य स्थळांमध्ये किंवा योग्य व्यक्तीकडे स्थानांतरण :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९६ :
बालकाचे भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील बालगृहांमध्ये किंवा विशेष गृहांमध्ये किंवा सुयोग्य स्थळांमध्ये किंवा योग्य व्यक्तीकडे स्थानांतरण :
१) राज्य सरकार कोणत्याही वेळी, समिती किंवा मंडळाच्या शिफारशीनुसार, या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, बालकाचे हित विचारात घेऊन, बालकाचे राज्यामधील कोणत्याही बालक गृहातून किंवा विशेष गृहातून किंवा सुयोग्य स्थळांमध्ये किंवा योग्य व्यक्तीमध्ये संबंधित समित्यांच्या पूर्वसंमतीने किंवा त्यांना माहिती देऊन स्थानांतरण करण्याचा आदेश देऊ शकेल :
परंतु असे की, बालकाचे स्थानांतरण त्याच जिल्ह्यातील सारख्याच गृहात किंवा संस्थेत किंवा व्यक्तीकडे करण्याचे अधिकार, यथास्थिती, समिती किंवा मंडळास आहेत.
२) जर राज्य शासन दुसऱ्या राज्यातील एखाद्या संस्थेकडे स्थानांतरण करणार असेल, तर संबंधित राज्य सरकारच्या सल्ल्यानेच सदर कारवाई केली जाईल.
३) अशा बदल्यांमुळे बालकाचा बालक गृहातील आणि विशेष गृहातील एकूण कालावधी वाढणार नाही.
४) पोटकलम (१) आणि पोटकलम (२) अंतर्गत पारित केलेले आदेश हे बालक ज्या भागात पाठवले आहे त्या क्षेत्राच्या समिती किंवा मंडळासाठी, यथास्थिती, कार्यान्वित केले आहे असे मानले जाईल.

Leave a Reply