बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९२ :
दीर्घकालीन वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकास मान्यताप्राप्त ठिकाणी स्थलांतरीत करणे :
जेव्हा समिती किंवा मंडळासमोर आणलेले बालक दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या शारीरिक किंवा मानसिक व्याधीने पीडित असेल तेव्हा समिती किंवा मंडळ बालकस मान्यताप्राप्त योग्य जागी उपचारास जो कालावधी आवश्यक असेल तेवढ्या कालावधीकरिता, विहित केल्या प्रमाणे, दाखल करण्याचा आदेश देईल.