JJ act 2015 कलम ९१ : बालकास हजर न ठेवण्याची मुभा देणे :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९१ :
बालकास हजर न ठेवण्याची मुभा देणे :
१) जर चौकशी कोणतीही असताना बालकाची हजेरी चौकशीसाठी आवश्यक नाही असे मंडळ किंवा समितीस वाटल्यास ते बालक हजर न ठेवण्यास मुभा देतील आणि मंडळ किंवा समिती बालकाची हजेरी त्याच्या जबाब नोंदणीपुरती सीमित ठेवू शकतील व बाकी चौकशी, बालकाच्या गैरहजेरीत चालविली जाईल जोपर्यंत अन्यथा आदेश न दिला जाईल.
२) जेव्हा जेव्हा मंडळ किंवा समितीसमोर बालकाने हजर राहण्याची आवश्यकता असेल, तेव्हा तेव्हा बालक त्याच्यासमोर सुरक्षितेसाठी एक व्यक्तीचा प्रत्यक्ष प्रवास भाडे खर्च, यथास्थिती, मंडळ किंवा समिती किंवा जिल्हा बाल संरक्षण केंद्राकडून देय असेल.

Leave a Reply